Mahabaleshwar

esahas.com

पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी

जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्‍या होणार्‍या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती बुधवारी (दि. 14) शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली.

esahas.com

पाचगणी बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.

esahas.com

वेण्णा नदीलगत लिंगमळा येथे अनधिकृत बांधकामाचा धडाका

महाबळेश्‍वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारक

esahas.com

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर कारचा झाडावर आदळून अपघात

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्‍वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.

esahas.com

लोकसहभागातून पाचगणीच्या कचरा व्यवस्थापनाचा डंका राजस्थानमध्ये

‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.

esahas.com

गोडवलीत उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजार रुपये दंड

गोडवली (ता. महाबळेश्‍वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्‍यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्‍याचा फोटो काढून पाठविणार्‍याला 500 रुपये बक्षीस देण्याचेही ठरवण्यात आले.

esahas.com

पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्‍याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

esahas.com

पाचगणी पालिकेने गांधीजींच्या स्मृतींचे टाकाऊ लोखंडी वस्तूपासून साकारले टिकाऊ शिल्प

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे. 

esahas.com

गुरेघरच्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे फोडणार्‍या तिघांना अटक

गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.

esahas.com

प्रत्येक ज्येष्ठांनी कोरोना लस घेण्यासाठी आग्रही राहावे

‘महाबळेश्‍वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.