महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील शेतकरी पॉवर टिलरमध्ये अडकून जागीच ठार झाला. शंकर शेलार असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.
पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.
पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दि. 16 एप्रिल ते मंगळवार, दि. 27 एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दि. 19 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला आहे.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.