Karad

esahas.com

मेव्हण्यानेच केला दाजीचा खून

कराड : बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना येथील वाखाण परिसरात घडली आहे.गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मजूरीचे काम करत असलेल्या दाजीचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.नितीन नागेश भालशंकर (वय 21) रा....

esahas.com

अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी हजारमाची ग्रा.पं. सदस्य पोलिसांच्या ताब्यात

हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या  पिस्टल बाळगल्याप्रकरणी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल जप्त केली आहे. सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय 31) रा. व्यापारी पेठ, ओगलेवाडी ता. कराड असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

esahas.com

पालिका निवडणूक पक्ष चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार : विक्रम पावसकर

गत नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सुमारे सहा जागा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी पालिकेला युती करायची की नाही? यावर सदर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून सर्वच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.

esahas.com

टोल भरण्यावरुन झालेल्या वादात सहा जणांना मारहाण

पुणे-बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा फोटो स्टेटसला ठेवणाऱ्यांवर गुन्हा

पीडित मुलगी पंधरा वर्षीय असून सध्या ती माध्यमिक शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचा फोटो दोन युवकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवला होता. तसेच त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.

esahas.com

वहागावजवळ तिहेरी अपघातात एकजण गंभीर

कराड : वहागाव-बेलवडे हवेली ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर आयशर, ट्रक आणि कारचा तिहेरी अपघात घडल्याची घटना घडली. समोरील कारने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून आलेल्या आयशरने कारला व आयशरला त्यापाठीमागे असलेल्या ट्रकने धडक दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर ...

esahas.com

सहकारमंत्री आहात की, सह्याद्रीचे चेअरमन हे स्पष्ट करा!

सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.

esahas.com

कराड तालुक्यातील गावांसाठी सामाजिक विकास योजनेतून निधी द्या

कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.

esahas.com

गजानन हाऊसिंग सोसायटीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन  मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

esahas.com

रोटरीतर्फे जागतिक पोलिओ दिनानिमित्त जनजागृती रॅली

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार जनजागृती रॅली काढण्यात आली.