maharashtra

रोटरीतर्फे जागतिक पोलिओ दिनानिमित्त जनजागृती रॅली


Awareness rally on the occasion of World Polio Day by Rotary
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार जनजागृती रॅली काढण्यात आली.

कराड : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार जनजागृती रॅली काढण्यात आली.
येथील स्व. वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयापासून रविवारी 24  रोजी सकाळी ९.३० वाजता सदर जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, विजयदिवस चौक, दत्त चौक, भेदा चौक, पोपटभाई पेट्रोल पंप, शाहू चौक मार्गे पुन्हा दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्याप्रशाला, नगरपालिका ते पुन्हा उपजिल्हा रुग्णालय असा या रॅलीचा मार्ग होता.
यावेळी रो. अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, सचिव रो. अभय पवार, क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो. डॉ. शेखर कोगणुळकर,  पब्लिक इमेज डायरेक्टर रो. राजेश खराटे,  रो. डॉ. राहुल फासे, रो. डॉ. मनोज जोशी, रो. राजेंद्र कुंडले, रो. राकेश पोरवाल, रो. शशांक पालकर, रो. रघुनाथ डुबल, रो. राजीव खलीपे, जगदीश वाघ, राहुल पुरोहित, अनघा बर्डे, प्रविण परमार, अजय भट्टड, बद्रीनाथ मस्के, चंद्रशेखर पाटील, अभिजीत चाफेकर, मुकुंद कदम, किरण जाधव, आनंदराव थोरात, इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ. मंजुषा इंगळे,  इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या अध्यक्षा सौ. माहेश्वरी जाधव, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचे अध्यक्ष अमित भोसले यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, रॅलीचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, कराड शहर वाहतूक निरीक्षक सौ. सरोजनी पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गटनेते  सौरभ पाटील, जयंत बेडेकर, हनुमंतराव पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाले.
रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी स्वागत केले. डॉ. राहुल फासे यांनी पोलिओ दिनाची माहिती दिली. सूत्रसंचालन रो. किरण जाधव यांनी केले. आभार क्लब सेक्रेटरी अभय पवार यांनी मानले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन केले.