maharashtra

अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी हजारमाची ग्रा.पं. सदस्य पोलिसांच्या ताब्यात

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Hazaramachi G.P. Member in police custody
हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या  पिस्टल बाळगल्याप्रकरणी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल जप्त केली आहे. सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय 31) रा. व्यापारी पेठ, ओगलेवाडी ता. कराड असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

कराड : हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या  पिस्टल बाळगल्याप्रकरणी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल जप्त केली आहे. सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय 31) रा. व्यापारी पेठ, ओगलेवाडी ता. कराड असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड-पाटण रोडवर एकजण अवैधरित्या  पिस्टल घेऊन आल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी सपोनि अमित बाबर व त्यांच्या पथकाला याबाबतची माहिती कळवून पुढील कारवाई करण्याचे  आदेश दिले. त्यानुसार माहिती मिळालेल्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा टाकला. सदर ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला पकडले.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याच्या कंबरेचे पाठीमागे पॅन्टच्या आतील बाजुस 45 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे मॅगझीनसह एक पिस्टल मिळून आले. याप्रकरणी अधिक तपास सपोनि अमित बाबर करीत आहेत.
ही कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केली.