सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१ -२०२६ च्या प्रचारार्थ ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी रविवाारी 31 रोजी पार्ले येथे सदिच्छा भेट दिली.
संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला.
ही वृद्धा तांबवेतून उत्तर तांबवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी निघाली असताना तिला मारहाण करत असल्याचा हावभाव चोरट्यांनी हात साफ केले. गौरी-गणपतीच्या सणावेळी २५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत शालन शामराव शिंदे रा. तांबवे यांनी शनिवारी ३० रोजी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मालखेड (नवे) ता. कराड तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी २९ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका घरातील ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने कर्त्यांनी लंपास केले आहेत.
फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
लोहारवाडी ता. कराड गावच्या हद्दीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
वारुंजी फाटा, ता. कराड येथे बेकरीला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रोख रक्कम, खाऊचे पदार्थ व फर्निचर असे सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड : येथील महिला महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाचे ग्रिल कापून चोरट्यांनी सुमारे 9 हजार 710 रुपये चोरून नेले. महाविद्यालयातील चोरी व तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राचार्या डॉ. स्नेहल राजेंद्र प्रभुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद क...