maharashtra

लोहारवाडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


Suicide by hanging of a youth in Loharwadi
लोहारवाडी ता. कराड गावच्या हद्दीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

कराड : लोहारवाडी ता. कराड गावच्या हद्दीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
प्रमोद बाजीराव चव्हाण (वय 27) रा. विठ्ठलवाडी ता. कराड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित बाजीराव चव्हाण यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खराडे करत आहेत.