maharashtra

तांबवेत वृध्देचे धुम स्टाईल बोरमाळ व मंगळसूत्र लंपास

Dhum style Bormal and Mangalsutra lamps of old age in copper
ही वृद्धा तांबवेतून उत्तर तांबवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी निघाली असताना तिला मारहाण करत असल्याचा हावभाव चोरट्यांनी हात साफ केले. गौरी-गणपतीच्या सणावेळी २५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत शालन शामराव शिंदे रा. तांबवे यांनी शनिवारी ३० रोजी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कराड : तांबवे ता. कराड येथे ६५ वर्षीय वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोडून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धुम स्टाईलने पोबारा केला.
ही वृद्धा तांबवेतून उत्तर तांबवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी निघाली असताना तिला मारहाण करत असल्याचा हावभाव चोरट्यांनी हात साफ केले. गौरी-गणपतीच्या सणावेळी २५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत शालन शामराव शिंदे रा. तांबवे यांनी शनिवारी ३० रोजी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शालन शिंदे या २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तांबवे येथील अण्णाबाळा पाटील विद्यालयाकडून मव्हटी नावाच्या शिवारात चालत निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण करत असल्याचा हावभाव करत त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमची बोरमाळ व ३ ग्रॅमचे मंगळसूत्र मिळून ४४ हजाराचे दागिने तोडून घेवून धुम स्टाईलने उत्तर तांबवेकडील बाजूला पोबारा केला. याबाबत शिंदे यांनी शनिवारी ३० रोजी फिर्याद दिल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.