maharashtra

कराडात नगरपालिकेकडून फटाके उडविण्यास प्रतिबंध


Prohibition of firing of firecrackers by the municipality in Karad
फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.

कराड : कराड शहरात नगरपालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके उडविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नागरिक विविध कार्यक्रम व सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर करतात. फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.
याबाबत नगरपालिकेने एक जाहीर आवाहन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विशेष सभा ठराव क्रमांक 4/ 27 दि. 15-7-2019 ने माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड शहरातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिक विविध प्रसंग/सण साजरे करण्यासाठी फटाके जाळतात. मात्र, त्या फटाक्यात असलेल्या कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. ते वायू वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही हानिकारक आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून कराड शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन  मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे.