maharashtra

टोल भरण्यावरुन झालेल्या वादात सहा जणांना मारहाण


Six people beaten in a dispute over toll payment
पुणे-बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

कराड : पुणे-बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहीतीवरुन, कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅव्हल्सचा टोल भरण्यावरुन हा राडा झाला. फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने बाचाबाचीतून हा वाद मोठा झाला. टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्या. याबाबतची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
26 तारखेच्या पहाटे टोल नाक्यावरील झालेल्या या राड्याचा व्हिडीओ माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.