कराड तालुक्यातील गावांसाठी सामाजिक विकास योजनेतून निधी द्या
केंद्रीय मंत्री आठवले यांना निवेदन : बनवडीतील विकासकामांसाठी 50 लाखाच्या निधीची मागणी
कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
कराड : कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
आरपीआयचे कराड दक्षिण अध्यक्ष युवराज काटरे यांच्या शोकसभेसाठी शनिवारी २३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कराड दौऱ्यावर आले असता शिवदास यांनी त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी बनवडी ग्रामपंचायत सदस्य योगेश गोतपागर, मारुतीराव साठे, शशिकांत पाटणकर व इतर नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून कराड तालुक्यातील विविध गावांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा.
दरम्यान, योगेश गोतपागर यांनी बनवडी ता. कराड येथील अंतर्गत विकास कामांसाठी सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत 50 लाख रुपये निधी द्यावा, अशा मागणीचे पत्र दिले. यावेळी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संबंधित स्वीय सहाय्यक यांना आपले कव्हरिंग लेटर देऊन त्यासंबंधित मंत्रालयाला पाठवून येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.


