maharashtra

अल्पवयीन मुलीचा फोटो स्टेटसला ठेवणाऱ्यांवर गुन्हा


Crime against those who keep the photo status of a minor girl
पीडित मुलगी पंधरा वर्षीय असून सध्या ती माध्यमिक शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचा फोटो दोन युवकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवला होता. तसेच त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.

कराड : अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवून त्या फोटोवर आक्षेपार्ह वाक्य लिहिणार्‍या दोघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एक मुलगा अल्पवयीन आहे. तर दुसरा २१ वर्षीय युवक आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी पंधरा वर्षीय असून सध्या ती माध्यमिक शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचा फोटो दोन युवकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवला होता. तसेच त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलासह युवकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.