crimeagainstthosewhokeepthephotostatusofaminorgirl

esahas.com

अल्पवयीन मुलीचा फोटो स्टेटसला ठेवणाऱ्यांवर गुन्हा

पीडित मुलगी पंधरा वर्षीय असून सध्या ती माध्यमिक शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचा फोटो दोन युवकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवला होता. तसेच त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.