राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कराड बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही.
संपूर्ण भारतात कोरोना महामारीमूळे मार्च २०२० ते आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे बहुतांश: उद्योगधंदे, व्यापार, रोजगार बंद झाल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत.
कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.
सरकार व कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत.
उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर लष्कराच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा.
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीबाबत यापूर्वी दि.3 ऑगस्ट रोजी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना पत्र देण्यात आले होते, त्यावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट रोजी चे पत्र आम्हाला देण्यात आले.