maharashtra

मॅगझिनसह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास कराडात अटक


Man arrested for carrying village pistol with magazine
कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

कराड : कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

अल्तमश उर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २१) रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ कराड असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९८ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व मॅगझिन जप्त केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बुधवार पेठ, नगरपालिकेसमोरील चौकात रेकॉर्डवरील संशयीत बेकायदा पिस्तूल बाळगत फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. याबाबतची माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, चालक हवालदार यादव, हवालदार विकास शेडगे यांच्या पथकाला देऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार या पथकाने शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील नगरपालिका चौकात सापळा लावला. यावेळी पोलिसांना अल्तमश उर्फ मोन्या तांबोळी याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली. यावेळी पोलिसांना त्याच्याकडे बेकायदा देशी बनावटीचे ९८ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व त्यामधील मॅगझिन मिळून आली. ती पोलिसांनी जप्त करुन मोन्या तांबोळी याला अटक केली. याबाबतची फिर्याद सहाय्यक फौजदार देसाई यांनी दिली आहे. त्यानुसार मोन्या तांबोळी याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.