Karad

esahas.com

कराडात एसटी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा

राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्‍यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

esahas.com

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग सुकर

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा जिल्हा रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजूरी देत असल्याचे कळवले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. शिवाय एमबीबीएसच्या शंभर जागा निर्माण झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

esahas.com

शेतकरी योग्य वेळी कारखानदारांना जागा दाखवतील : साजिद मुल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी या कायद्याची अंमलबजावणी का करत नाहीत.

esahas.com

पुणे बंगलोर महामार्गावर उभ्या मालट्रकला इनोव्हाची धडक : दोन महिला ठार, चार जखमी

पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.

esahas.com

कराडात एसटी कर्मचार्‍यांनी मुंडन करून नोंदवला निषेध

कराड बस स्थानकासमोर कर्मचार्‍यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांसह सरकारचाही घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

esahas.com

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सुरू केलेली बेकायदेशीर वाहतूक बंद करा

सध्या, राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु, त्यांचे आंदोलन मोडीत  काढण्यासाठी खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून ही बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  

esahas.com

वडोली-निळेश्वरमध्ये चोरट्यांकडून सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास

वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना  घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु,  अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून  २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे

esahas.com

प्रशासनाने 2013 च्या ऊस आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.

esahas.com

शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली तरच राष्ट्र प्रगत बनते : आ. पृथ्वीराज चव्हाण

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

esahas.com

जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंचा कराडात मॅरेथॉन दौरा

जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी ८ रोजी कराडात मॅरेथॉन दौरा केला. त्यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने तिघांशीही राजकीय चर्चा केली.