Karad

esahas.com

कराडला एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात संप सुरु आहे. कराड आगारात मंगळवार दि. १६ रोजी संपाचा नववा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांची आवडती लालपरी गेले नऊ दिवस आगारात उभी राहिली आहे.

esahas.com

कोयना पूलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.

esahas.com

तासवडे टोल नाक्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट

सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर  मोटारसायकलने अचानक पेट घेतला.

esahas.com

चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने केले ठार

ऊस तोडणी कामगारांच्या चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही दुर्देवी घटना (सोमवार) सकाळी साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास येणे (ता. कराड) येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

esahas.com

सवादेत उसाच्या ट्रॅक्टरमधून पडून एक ठार 

सवादे येथे ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक सुरु होती. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात घसरला. त्यामुळे ट्रॅक्टरमधून पडून विनायक पोतदार व अन्य एकजण जखमी झाले.

esahas.com

कार्वे येथे एकाची आत्महत्या

कार्वे येथे एकाची आत्महत्या कराड : कार्वे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी निवास थोरात (वय ३५) रा. कार्वे असे मृताचे नाव आहे. रविवारी दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघकीस आली. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय मोरे करत आहेत.

esahas.com

सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यास अटक

निशांत धोगडी हा शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये गेला होता. त्याने सोन्याची चेन खरेदी करायची असल्याचे सांगून दुकानदाराकडून चेन बघण्यासाठी घेतली. त्यानंतर संधी साधून तो 30 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन घेऊन तो दुकानातून पसार झाला.

esahas.com

कराडात 'बळीराजा'चे धरणे सातव्या दिवशीही सुरूच  

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे.

esahas.com

कराड पालिकेचे ‘होम टू होम’ जनजागृतीत सातत्य

शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.

esahas.com

स.गा.म.महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे

रयत शिक्षण संस्थेने कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या व्यवसायाभिमुख कोर्सच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे यांची निवड केली. याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचा सत्कार केला.