maharashtra

कोयना पूलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या


Woman commits suicide by jumping off Koyna bridge
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.

कराड : येथील जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मजूर वीटभट्टीच्या कामानिमित्त भट्टी परिसरात काम करत होते. याच वेळेला संबंधित विवाहितेने जुन्या कोयना पुलावर जाऊन नदीपात्रात उडी घेतली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर पात्राकडेला असणाऱ्या अन्य महिला व नागरिकांनी तात्काळ धाव घेत विवाहितेला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पुलावर तसेच वीटभट्टी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.