maharashtra

सवादेत उसाच्या ट्रॅक्टरमधून पडून एक ठार 


One killed after falling from a sugarcane tractor
सवादे येथे ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक सुरु होती. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात घसरला. त्यामुळे ट्रॅक्टरमधून पडून विनायक पोतदार व अन्य एकजण जखमी झाले.

कराड : सवादे, ता. कराड येथे ऊसाचा ट्रॅक्टर नाल्यात घसरल्याने ट्रक्टरमधून पडून एकजण ठार झाला. तर एकजण जखमी झाला आहे. रविवारी दि. १४ रोजी दुपारी ही घटना घडली. विनायक अनंत पोतदार (वय ४९) रा. सवादे असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर जखमीचे नाव समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सवादे येथे ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक सुरु होती. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात घसरला. त्यामुळे ट्रॅक्टरमधून पडून विनायक पोतदार व अन्य एकजण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र विनायक पोतदार हे उपचारांपूर्वीच मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर अन्य एकजण जखमी असून त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेची नोंद सायंकाळी कराड ग्रामीण पोलिसांत झाली आहे. सहाय्यक फौजदार संजय मोरे तपास करत आहेत.