maharashtra

कराड पालिकेचे ‘होम टू होम’ जनजागृतीत सातत्य


Continuation of Karad Municipality's 'Home to Home' public awareness
शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.

कराड :  शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.
त्यामध्ये आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्येक घराच्या परिसरात असणारे पाण्याचे हौद, प्लास्टिकच्या वस्तू, टायर, भंगारचे डबे, फ्रीज मागील ट्रे, झाडांच्या कुंड्या, नारळाच्या करवंट्या आदींमध्ये पाणी साचू न देणे, तसेच नियमित स्वच्छता करणे आदींबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच बहुतांशी पहाणीत घरातील फ्रीज मागील ट्रे मध्ये सर्वाधिक डासांच्या अळ्या सापडत असल्याने नियमित त्याठिकाणी तपासणी करण्याचे आवाहनही पथकाकडून नागरिक, विशेषतः गृहिणींना करण्यात आले.
या मोहिमेत रुक्मिणी गार्डन भाग 1 व 2 याठिकाणी येथे एकूण 43 घरांमध्ये ‘होम टू होम’ जनजागृती करण्यात आली. तसेच, दोन दिवसांपूर्वी शहरातील शिक्षक कॉलनीतील झोपडपट्टीतही 69 घरांची पहाणी करून होम टू होम जनजागृती करण्यात आली. तसेच डेंगूची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या घरी जाऊन तेथील परिसर व घरातील वस्तूंची तपासणी करण्यात आली.
त्याचबरोबर शहरातील हॉस्पिटलमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे आदींचे रुग्ण आहेत का? याचीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्ण आढळलेले नाहीत.