maharashtra

सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यास अटक

कराडातील घटना : सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन हस्तगत

Thief arrested for stealing gold chain
निशांत धोगडी हा शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये गेला होता. त्याने सोन्याची चेन खरेदी करायची असल्याचे सांगून दुकानदाराकडून चेन बघण्यासाठी घेतली. त्यानंतर संधी साधून तो 30 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन घेऊन तो दुकानातून पसार झाला.

कराड : कराडात शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये चोरट्याने सोन्याची चेन लांबवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी 13 रोजी सकाळी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकानात जाऊन तो चलाखी करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चोरीची चेन हस्तगत केली आहे.
निशांत परशुराम धोगडी (वय 22) रा. आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निशांत धोगडी हा शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये गेला होता. त्याने सोन्याची चेन खरेदी करायची असल्याचे सांगून दुकानदाराकडून चेन बघण्यासाठी घेतली. त्यानंतर संधी साधून तो 30 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन घेऊन तो दुकानातून पसार झाला.
यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांना सदरचा प्रकार समजताच त्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन जप्त केली आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र सदाशिव कदम यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.