रयत शिक्षण संस्थेने कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या व्यवसायाभिमुख कोर्सच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे यांची निवड केली. याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचा सत्कार केला.
कराड : रयत शिक्षण संस्थेने कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या व्यवसायाभिमुख कोर्सच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे यांची निवड केली. याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी सीनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस.ए. पाटील (विज्ञान विभाग), प्रा. नेताजी सूर्यवंशी (कला विभाग), प्रा. माधुरी कांबळी (वाणिज्य विभाग), नॅक समन्वयक प्रा. गिरीश कल्याणशेट्टी, रजिस्टार आर.वाय. गायकवाड, व्ही.डी. भोज उपस्थित होते.
प्रा. बाळासाहेब नलवडे यांना व्यवसायाभिमुख कोर्सच्या बाबतीत प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा महाविद्यालयास निश्चित फायदा होईल, असे मत डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले. दरम्यान, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. बाळासाहेब नलवडे यांचे अभिनंदन केले.