maharashtra

कराड पालिका पदाधिकारी दिव्यांग बांधवांचा प्रश्न सोडवणार का?

इम्रान मुल्ला, सतीश पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

Will Karad Municipal Corporation office bearers solve the problem of Divyang brothers?
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीबाबत यापूर्वी दि.3 ऑगस्ट रोजी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना पत्र देण्यात आले होते, त्यावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट रोजी चे पत्र आम्हाला देण्यात आले.

कराड : राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीबाबत यापूर्वी दि.3 ऑगस्ट रोजी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना पत्र देण्यात आले होते, त्यावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट रोजी चे पत्र आम्हाला देण्यात आले. त्यामध्ये कराड नगरपालिका स्व उत्पन्नातून दिव्यांग निधी पाच टक्के कशा प्रकारे काढते, हे दाखविण्यात आले होते. परंतु नगरपालिका ज्या पद्धतीने स्व उत्पन्नातून निधी काढते तो प्रकार पूर्णपणे चूकीचा आहे.
त्यानंतर पुन्हा संघटनेकडून दि.२० ऑगस्ट रोजी मुख्याधिकार्‍यांना पत्र देण्यात आले. त्या पत्रासोबत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक 2021 प्र. क्र. 09 / वि. त / 3 / दि. 24 मार्च अवर सचिव महाराष्ट्र शासन विजय चांदेकर यांच्या आदेशानुसार नगरपालिका स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे असताना नगरपालिका प्रशासनाला या विषयाचे अवलोकन होत नसल्याने आपण आपल्या जनरल मिटिंग द्वारे हे विषय सभाग्रहात चर्चेला घेऊन नगरपालिकेच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी ठेवण्याचा ठराव करून घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला व प्रहार जनशक्ती पक्षाचे कराड तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.