म्हसवड येथील कोवीड सेंटरला तीन लाख रुपये किंमतीचे बँकेकडून पहिले व्हेटिलेटर बायपॅप मशिन देण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी सहकार्य केले तर येथे जिल्ह्यातील एक आदर्श आयसीयु सेंटर उभारण्यासाठी जिल्हा बँक व देसाई कुटुंबाच्या माध्यमातून देण्यास मी तयार आहे. - अनिलभाऊ देसाई, संचालक, सातारा जिल्हा बँक
महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी कोरेगावच्या आमदार महेश शिंदेंचा नंबर लागतो. कोरेगाव मतदारसंघातील जनता त्यांना अक्षरशः देवदूत म्हणून ओळखते याच्याच पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोरोनाला थोपविण्यासाठी आमदार महेश शिंदे हे अहोरात्र आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करीत आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांनी दोन भव्यदिव्य अशी कोविड हॉस्पिटल उभी करून को...
गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून, ही सकारात्मक बाब आहे. मात्र तज्ज्ञांनी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेचा सामना करण्यासाठीही कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रूग्णांनी स्वत:च घरात उपचार घेत न बसता, दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रूग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत, डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट
सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील ६ हजाराहून अधिक लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा त्यांनी गोंदवले येथे स्व खर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव तसेच लॉकडाऊन मुळे। सर्वच ठिकाणचे व्यवसाय धंदे बंद असल्याने सर्व सामान्य लोकाचे जग...
"सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा असताना जनतेच्या सुरक्षिततेसाठी सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने त्वरित लस खरेदी करून लोकांसाठी लसीकरणाची सोय केली आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलना लस खरेदीची परवानगी दिल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव खासगी रुग्णालय आहे ज्यांनी लस उपलब्ध केली आहे. " - विश्वजित डुबल, मार्केटिंग मॅनेजर
या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले २००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे. - डॉ. वैशाली मोहिते
ढेबेवाडी खोऱ्यात आढळलेले कासव विदेशात सापडते. हे Red eared slider turtl सिंगापूरी वा मलेशियन कासव नावाने ओळखले जाते. ते जमिनीवर व पाण्यात राहणारे असून ते पाळण्यातही येते - डॉ. सुधीर कुंभार, वन्यजीव प्रेमी
दोनचं दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था या पवनचक्की कंपन्यांनी करावी अशी मागणी केली होती. पाटण कोविड केअर सेंटरला रत्नागिरी विंड पॉवर प्रोज...
येथील नगरपालिका संचालित जीवनधारा कोविड सेंटर ची विनाकारण बदनामी केली जात आहे. ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी प्रातांधिकारी संतोष भोर यांना निवेदन दिले आहे. प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व तालुका प्रशासनाच्या आग्रहामुळे तालुका व विटा शहरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था व्हावी. यासाठी ...
मातृभूमीशी ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी... वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर शहरी भागांत वैद्यकीय व्यवसायाच्या चांगल्या संधी होत्या, मात्र आपल्या ग्रामीण भागाशी असणारी नाळ कायम ठेवण्याचे संस्कार आई वडीलांनी दिले होते. त्यामुळे आपल्या मातृभूमीशी असणारे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी अवघ्या ३० दिवसांत हॉस्पिटल व कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉ. सचिन साळुंखे यांनी सांगितले.