फलटण व माण तालुक्यात करोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश पवार यांनी देत मनुष्यबळ आणि सुविधा देत आहोत त्यामुळे कामाचा रिझल्ट दिसलाच पाहिजे अन्यथा कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वाई, दि. २८: भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यावर महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. आपल्या सातारा जिल्हयातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयात कडक लॉकडाउन केलेले आहे. या कोरानाचा पार्श्वभुमीवर आज वाई नगरपरिषदेची विशेष सभा व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. पहिल्यांदाच या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही आघाड्यांनी गट-तट न पाह...
पिंपरे बु॥ ता खंडाळा येथील कापसेवस्ती येथे बांधकाम उद्योजक विलास यादव यांच्या फार्म हाऊसवर ग्रामस्थाच्या वतीने लोकसहभागातुन कोरोनाबाधित रुग्णासाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिपंरे बु॥ गावचे युवा नेते संभाजी घाडगे यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन बैठकीत खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी रस्त्याकडेला असणारी झुडपे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने अजून काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना संपर्क साधला असता या संदर्भात अहवाल मागवून घेऊ तसेच प्रत्यक्षात कामास सुरुवात नसेल तर त्यांना पुन्हा एकदा या विभागाला सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया श्रीफ कासार यांनी दिली
सातारा : सातारा जिल्ह्याला आतापर्यंत 72 हजार 890 कोव्हॅक्सिन व 6 लाख 29 हजार 270 कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे. इथून पुढे उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येईल हे सांगून भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी घ्यावयाच्या खबरदारी व करावयाच्या उपाययोजना बाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केल्या. सातारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ...
सोनी मराठी वाहिनीवरील मालिका तू सौभाग्यवती हो ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे लग्न होतं...
पुसेसावळी : महामारीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही समाजकारणाचा घेतलेला वसा सोडणार नाही. आम्ही पाठपुरावा केलेल्या कोरोना सेंटरचे धैर्यशील कदमांना श्रेय मिळेल या भितीने पुसेसावळीत कोविड सेंटरचे चोरीछुपे उद्घाटन करून कोरोना महामारीचे राजकारण करणाऱ्या मुजोर पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही असा घणाघाती टोला वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी ल...
दहिवडी ः माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळाविरूध्द उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या राज्यभर कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या स...
मालखेड ता.कराड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गावातील गर्दीची ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण कर...
फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे