गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून, दरम्यानच्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले. सर्वांवर उपासमारीची वेळ आली. यात शेतकर्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यानच्या काळात वीजवितरणकडून भरमसाठ रकमेने वीजबिल व कृषिपंपाच्या बिलांचे वितरण करण्यात आले. पण लॉकडाऊनच्या झळा सोसलेल्या शेतकर्याला ही भरमसाठ कृषिपंप बिले भरणे शक्य नाही, तरी शेतकर्यांची परिस्थिती पाहून वीज वितरणने कृषिपंपाची बिले कमी करावीत, अशी
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 111 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 35 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
भिलार (ता. महाबळेश्वर) येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींच्या भीषण अपघातात श्वेता शशिकांत ओंबळे (वय 23) ही युवती ठार जाली असून, अनिकेत आनंदा चिकणे (वय 20) गंभीर जखमी तर अन्य एक जखमी झाला आहे.
जीएसटी ऑनलाईन व्यवसाय यांच्या नियमांच्या अन्यायकारक अटींमुळे होणार्या त्रासाविरोधात शुक्रवार, दि. 26 रोजी त्यांचे शिखर संघटना कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया (उअखढ) यांनी पुकारलेल्या भारत बंदला सातारा जिल्ह्यात पाठिंबा देण्याचा निर्णय सातारा जिल्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी घेतला आहे
‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं अपवादात्मक असतात.
‘जाखणगाव येथील सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक परिसरातील शेतकर्यांना सुविधा पुरवणारी फार मोठी एक आदर्शवत यंत्रणा ठरेल, तसेच गट सेंद्रिय निविष्ठाचे हब बनेल,’ असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे यांनी केले.
‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
पुसेगाव येथील एका विद्यालयामध्ये कोरोनाचे आणखी 14 विद्यार्थी सापडल्याने ते विद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे.