sports

कोरोना काळातील कृषिपंपाची वाढीव बिले कमी करावीत

‘कोरेगाव शहर विकास मंच’ची वीजवितरणकडे निवेदनाद्वारे मागणी

गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून, दरम्यानच्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले. सर्वांवर उपासमारीची वेळ आली. यात शेतकर्‍याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यानच्या काळात वीजवितरणकडून भरमसाठ रकमेने वीजबिल व कृषिपंपाच्या बिलांचे वितरण करण्यात आले. पण लॉकडाऊनच्या झळा सोसलेल्या शेतकर्‍याला ही भरमसाठ कृषिपंप बिले भरणे शक्य नाही, तरी शेतकर्‍यांची परिस्थिती पाहून वीज वितरणने कृषिपंपाची बिले कमी करावीत, अशी

कोरेगाव : गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून, दरम्यानच्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले. सर्वांवर उपासमारीची वेळ आली. यात शेतकर्‍याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यानच्या काळात वीजवितरणकडून भरमसाठ रकमेने वीजबिल व कृषिपंपाच्या बिलांचे वितरण करण्यात आले. पण लॉकडाऊनच्या झळा सोसलेल्या शेतकर्‍याला ही भरमसाठ कृषिपंप बिले भरणे शक्य नाही, तरी शेतकर्‍यांची परिस्थिती पाहून वीज वितरणने कृषिपंपाची बिले कमी करावीत, अशी मागणी ‘कोरेगाव शहर विकास मंच’च्या कोरेगाव वीजवितरण अभियंता महामुनी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनातील अधिक माहिती अशी की, वीजवितरण कार्यालयाकडून वितरित केलेली वीजबिले पाहिली तर वीज बिलापोटी शेतकर्‍याला शेती विकूनही ही बिले भरणे शक्य होणार नाहीत अशी बिले आपणाकडून आली आहेत, अशी बिले शेतकरी भरूच शकणार नाही. त्याचा राहिला साहिला जीव घेण्याचा प्रकार आपणाकडून होत आहे. तरी नियमित वीज बिलाप्रमाणे आकारणी होऊन त्यामध्ये सूट देऊन शेतकरी पुन्हा शेतीपंपांचा वापर करू शकेल, अशी तजवीज होणे गरजेचे आहे. 

त्यामुळे सर्व शेतकर्‍यांच्या शेतीपंपावरील वीजबिले कमी करून मिळावीत व शेतीपंपांची वीज कनेक्शन तोडली जावू नयेत. तसेच याम मागणीचा त्वरित योग्य निर्णय न झाल्यास घेराव आंदोलन करून कार्यालयास टाळे ठोकण्यात येतील व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, अधिक जाधव, राजू बागवान, विनोद गोरे, रामचंद्र बोतालजी, सुरेश फडतरे, विट्ठलराव काटे, संतोष कदम, अनिल बर्गे, चंद्रकांत शिंदे, रोहित जाधव, बजरंग कांबळे, रमेश जाधव, प्रकाश बर्गे, महादेव कदम, अनिल पवार, सुनील कदम यांच्या सह्या आहेत.