कराडः छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी व्यक्त केले. वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाठार येथे शिवजयंती नि...
पुळकोटी (ता. माण) येथील सुलभा मारूती गलंडे व मारूती बिरा गलंडे यांना पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील कर्मचार्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 201बाधितांची नोंद झाली असून, 96 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवाला सातारच्या दिशेने निघाला होता. दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची ...
सातारा : दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी माण-खटाव तथा इन्सिडंट कमांडर शैलेश सुर्यवंशी यांनी 22 फेब्रुवारीच्या रात्री 00.00 पासुन पुढील आदेश हाईपर्यंत घोषित केले ...
कराड : फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील कार्यालय कराड, वर्ग 3, रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, रिमांड होमच्या पाठीमागे, मलकापूर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव...
टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने यावर्षी होणारी घाटजाई-काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून, फक्त धार्मिक विधीचे कार्यक्रम होणार आहेत, असे यात्रा कमिटीने सांगितले.
महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक घडवून आणली. विहित कालावधीत विद्युत विभाग शासन दरबारी मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्वासन उपस्थित