sports

‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे पालिका कर्मचार्‍यांना मास्क वाटप


कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी किशोर बर्गे म्हणाले, ‘संत गाडगे बाबांनी समाजाची सेवा व स्वच्छता यातच आपले आयुष्य वेचले. त्या बाबांची जयंती साजरी करताना आपणास त्यांचे सेवाभावी विचार व स्वच्छतेचे महत्त्व आचरणात आणत असताना आता कोरोनामुळे जी महामारी उद्भवली आहे, त्यास प्रतिकार करण्यासाठी व आपल्या सोबत इतरांची काळजी घेण्यासाठी आरोग्य सुरक्षा मोहीम राबविली पाहिजे. मुख्यत: प्रत्येकाने आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून सक्तीने मास्कचा वापर केला पाहिजे. नगरपंचायत ही सर्वांसाठी खुली असते, त्यामुळे कर्मचार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी.’

यावेळी खरात, मेघा सूर्यवंशी, दीप्ती बर्गे, महाडिक, धनंजय पंडित व इतर उपस्थित होते.