स्नेह आपुलकीची भावना तेथेच खरा जिव्हाळा
श्रीरंग काटेकर यांचे मत : गौरीशंकर डी फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळवा उत्साहात
‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
सातारा : ‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
लिंब येथील गौरीशंकर डी. फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऑनलाइन माजी विद्यार्थी दशकपूर्ती स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य विजय राजे, माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष महेश एरंडे, उपाध्यक्ष अस्मिता गिते, सेक्रेटरी दशरथ जगताप, समन्वयक प्रा. सविता मोरे, प्रा. सारिका लोखंडे, प्रा. प्रसाद डुबल, प्रा. स्वाती पवार आदी प्रमुख उपस्थित होत
काटेकर म्हणाले, ‘माजी विद्यार्थ्यांचे अलोट प्रेम महाविद्यालयास लाभले आहे. त्याच्या अनमोल साथीमुळेच महाविद्यालयाने अल्पावधीत प्रगती साधली आहे. सध्या विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. या काळात संवाद लुप्त होत चालला आहे, हे जरी खरे असले तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी संवाद व समन्वयाचे नाते जोपासले पाहिजे.’
प्राचार्य विजय राजे म्हणाले, ‘महाविद्यालयातून ज्ञान घेतलेले असंख्य माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे.विद्यार्थी सक्षम घडल्याचा आनंद आहेच; पण एक सुसंस्कृत पिढी घडवत आहोत, याचेही मनस्वी समाधान वाटते.’
प्रारंभी माजी विद्यार्थी संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू माजी विद्यार्थी ज्योती मोरे, अनिकेत शिर्के, कार्तिकी कुटे, योगीता पवार, अनिकेत काळंगे, विशाल शिंदे, पुसाळेकर यांना प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक कार्यकाळात सुहास रासकर, प्राजक्ता भांडवलकर, कैलास सूर्यवंशी, प्रद्युम्न सापुर्डे, अनिकेत घुगे, सुजाता बिक्कड, विशाखा चव्हाण, अविनाश पारे, महेश जगताप, कनिफनाथ ओमासे या गुणवंत व विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी कैलास सूर्यवंशी, रेश्मा ऐवळे, सागर ढवळे व अन्य विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रा. सविता मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.