अवैधरित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोरखळ, तालुका सातारा येथे बैलगाडी शर्यती दरम्यान एका बैलगाडीतून पडलेल्या 21 वर्षे युवकाच्या अंगावरून मागून येणाऱ्या बैलगाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली.
मोटर सायकल चोरून त्या परस्पर विकणाऱ्या दोन आरोपींना तुपेवाडी तालुका खटाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.
फुकट फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना सातारा पालिकेने आज कठोर चाप लावला. अतिक्रमण हटाव विभागाने शहरात धडक कारवाई करत तब्बल शंभर फ्लेक्स जप्त केले.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सवाला महिला बचत गटातील भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील घौडदौड आता सातारा जिल्ह्यात देखील होण्यास सुरुवात झालेली आहे. दि. 4 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील माण तालुक्यामधील जांभुळणी या दुर्गम व दुष्काळी गावात देखील आपची शाखा स्थापन झालेली आहे. ‘आप’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालय देखील सुरु करण्यात आलेले आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस असल्याचे भासवून एकाने 97 हजारांना गंडा घातल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.