maharashtra

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा


विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 जून 2013 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कोमल सुधीर गायकवाड राहणार वाई तालुका वाई या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती सुधीर राजेंद्र गायकवाड, सासू नंदा राजेंद्र गायकवाड, सासरे राजेंद्र रामचंद्र गायकवाड, नणंद रेश्मा धरम जगताप सर्व रा. खेड शिवापुर, कुसगाव, ता. भोर, जि. पुणे आणि नणंद सीमा राजू घोडके रा. पुणे यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मुजावर करीत आहेत.