नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2021 ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून विविध लोकांची सुमारे 5 लाख 12 हजार 400 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ओंकार खाशाबा जाधव आणि रामदास खाशाबा जाधव दोघेही रा. धकटवाडी, ता. खटाव यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ओंबासे करीत आहेत.


