maharashtra

सराईत मोटर सायकल चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोटर सायकल चोरून त्या परस्पर विकणाऱ्या दोन आरोपींना तुपेवाडी तालुका खटाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.

सातारा : मोटर सायकल चोरून त्या परस्पर विकणाऱ्या दोन आरोपींना तुपेवाडी तालुका खटाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.
सोमनाथ शिवाजी जाधव रा. फडतरवाडी, ता. खटाव व सागर संजय शिंदे वय 27, रा. कापील, ता. कराड अशी संबंधित संशयितांची नावे आहेत.
वाढत्या मोटरसायकल चोरींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना देऊन सतर्क केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मोटरसायकल चोरी प्रकरणातील इसम तुपेवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुपेवाडी येथे सापळा रचून एका इसमाला जिल्हा परिषद शाळेच्या नजीक ताब्यात घेतले. मोटरसायकल स्वाराने तत्पूर्वी गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस हवालदार अमोल माने यांनी त्याच्यावर झडप घालून त्यास पकडले.
संबंधिताकडे चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल त्याने आपल्या साथीदारांसह यशवंतराव चव्हाण ब्लड बँक सुपर मार्केट कराड येथून तसेच इतर तीन मोटरसायकल त्याने आपल्या साथीदारांसह चोरल्याचे कबूल केले. एकूण 87 हजारांच्या 4 मोटरसायकल जप्त करून पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने सुधीर बनकर, मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, राजकुमार ननावरे, अमोल माने, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजित करणे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, अजय जाधव, केतन शिंदे, स्वप्निल दौंड यांनी सहभाग घेतला होता.