अवैधरित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अवैधरित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास औंध ते चौकीचा आंबा जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल धीरज महाडिक यांना विशाल संदीप भोसले वय 24 आणि अक्षय प्रमोद हजारे वय 18, दोघेही रा. जुना स्टॅन्ड, औंध, ता. खटाव यांच्याजवळ अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, बजाज पल्सर मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असा 1 लाख 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संबंधितांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास डी.पी. दराडे करीत आहेत.


