मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार आक्रमक झाले. त्यांनी तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. पत्रकारांनी दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफीस उघडं आहे. ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर आल्याने धम्माल उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले.
या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारहाणीसह जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.