महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी पोस्ट डिस्कळ तालुका खटाव गावच्या हद्दीत शारदा दत्तात्रय काळे यांच्या घरात जमिनी संदर्भात बैठक सुरू असताना या बैठकीचे वादात रूपांतर होऊन या वादात तेथीलच विशाल अर्जुन वाघ, अर्जुन बाबुराव वाघ, विद्या अर्जुन वाघ, मोनिका विशाल वाघ यांनी शारदा काळे यांना मारहाण करीत त्यांचा विनयभंग केल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सी. आर. खाडे करीत आहेत.