maharashtra

मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा


मारहाणीसह जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मारहाणीसह जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालय सातारा येथे गोविंद श्रीरंग गायकवाड रा. गोडोली, ता. सातारा हे जमिनीचे नकाशे अर्ज जमा करण्यासाठी सातारा येथील तहसीलदार कार्यालयात गेले असता चंद्रकांत मुगुट गायकवाड, सचिन मुकुट गायकवाड, विजय गणपत गायकवाड आणि इतर एक जण अशा चौघांनी गोविंद गायकवाड यांना काठीने आणि उसाने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेन खेचून नेऊन तसेच त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.