युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 फेब्रुवारी रोजी सातारा शहरा नजीकच्या उपनगरात राहणारी एक युवती सातारा शहरात वडिलांबरोबर आली असता सुरज गाडे (पूर्ण नाव माहित नाही) वय अंदाजे 22, रा. माची पेठ, सातारा याने तिला मारहाण करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दरम्यान तिचे वडील मध्ये आले असता त्यांनाही गाडे याने हाताने मारहाण केली. याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार गायकवाड करीत आहेत.


