पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 फेब्रुवारी रोजी देगाव, ता. सातारा येथे सुधा मानसिंग माने राहणार देगाव, ता. सातारा यांना तसेच त्यांच्या पतीला तेथीलच सुधा माने यांचे दीर ज्ञानदेव निवृत्ती माने यांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस. के. पिसाळ करीत आहेत.


