पुसेगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटार सायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी, तर चालकाची पत्नी जागेवर ठार झाली.
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच ११ डी डी ००७ हा त्यांचा लकी नंबर घेतला आहे.
संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा नक्की कोणासाठी? याबाबतच्या चर्चांना आता गल्लोगल्ली ऊत आलाय. नक्की कोणाच्या भल्यासाठी हा बंद पुकारण्यात आला? याचे उत्तर सत्ताधार्यांनी द्यावे, अशी मागणी युवा राज्य फौंडेशन संघटनेचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले.
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात आर्थिक लाभासाठी चुकीचा कारभार होत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयातून फलटण तालुक्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय गावठाणातील राखीव प्लॉट खातेदाराला वाटप करून त्यांची लगेच विक्रीही करण्यात आली आहे.
तमाम ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांबाबत आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसीलदार यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.
लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्या करुन धुडगूस घालणार्या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड जि.सातारा व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.