महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

कुरिअर डिलिव्हरी बॉयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आणखीही गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आहेत

लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र तेथील परिस्थिती हाताळण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मराठवाड्यात पुरात वाहून गेलेली शेती, अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. असे अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आ वासून उभे आहेत महाविकास आघाडीने त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लगाविला. 

esahas.com
महाराष्ट्र

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील संबंधीत सर्व शासकिय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या ग्राहकांना स्वतंत्र IFSC कोड द्वारे थेट NEFT/RTGS ची सुविधा उपलब्ध !

सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)  ने बँकेच्या ग्राहकांना थेट मेंबरशिपद्वारे  NEFT/RTGS ची सुविधा सुरु करणेस मान्यता दिली असून बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खावली येथील जागा द्यावी!

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उपकेंद्रासाठी खावली येथील जागा उपलब्ध होणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय विभागांची येत्या आठवडयात बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आम जनतेच्या वतीने विशेष विनंती केली.

esahas.com
महाराष्ट्र

अजिंक्यतारा कारखाना उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवणार 

ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे : खा. उदयनराजे

सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शाहुनगर,विलासपूर, गोडोली हा संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे. येथील रहिवासी नागरीकांच्या सोयीसाठी गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारीशेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य तलाठी जावली संघटनेच्या वतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

हिरकणी रायडर शुभांगी पवार हिचा अपघाती मृत्यू

हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय ३२) हिचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे ही दुर्घटना घडली. टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाली.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर वाई तालुक्यात बलात्कार

वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर ३२ वर्षीय तरुणाने महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.