maharashtra

सातारा जिल्हा पुनर्वसन विभागाचा अजब कारभार


Strange management of Satara District Rehabilitation Department
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात आर्थिक लाभासाठी चुकीचा कारभार होत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयातून फलटण तालुक्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय गावठाणातील राखीव प्लॉट खातेदाराला वाटप करून त्यांची लगेच विक्रीही करण्यात आली आहे. 

सातारा : सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात आर्थिक लाभासाठी चुकीचा कारभार होत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयातून फलटण तालुक्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय गावठाणातील राखीव प्लॉट खातेदाराला वाटप करून त्यांची लगेच विक्रीही करण्यात आली आहे. 
या जमीन वाटपात एका बड्या राजकीय नेत्याचा हात असून त्याच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना या जमिनीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जमिनींची किंमत ही कोटींच्या घरात असून शासकीय नियमांनुसार या जमिनीचे वाटप करता येत नाही. मात्र तरीही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे आणि लाखोंच्या आर्थिक लाभासाठी या जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता संबंधित विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. केवळ या घोटाळ्यामुळे कायद्याचा बेकायदेशीर आधार घेणार्‍यांना आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ते कदापि सोडणार नसल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी या प्रकरणासंदर्भांत दिला.