maharashtra

शशिकांत कणसे यांची सानिका टूल्स कंपनीच्या सल्लागार संचालकपदी नियुक्ती


Appointment of Shashikant Kanase as Advisory Director of Sanika Tools Company
येथील सानिका टूल्स कंपनीच्या सल्लागार संचालकपदी दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी शशिकांत कणसे यांची आज नियुक्ती करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष जितेंद्र शिंदे यांनी त्यांना आज तसे नियुक्तीपत्र प्रदान केले. 

सातारा : येथील सानिका टूल्स कंपनीच्या सल्लागार संचालकपदी दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी शशिकांत कणसे यांची आज नियुक्ती करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष जितेंद्र शिंदे यांनी त्यांना आज तसे नियुक्तीपत्र प्रदान केले. 
तीन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या सानिका टूल्स कंपनीची स्थापना सातारा येथे 2011 साली करण्यात आली. एकाच वेळी सातारा, कराड, सांगली, पलुस, ओगलेवाडी, शिरवळ, पुणे येथे या कंपनीचे कामकाज चालते. नजीकच्या काळात पुणे जिल्ह्यात कंपनीचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा संकल्प  असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील माहिती असणाऱ्या तज्ञ आणि सल्लागार संचालकाची कंपनीला गरज होती. औद्योगिक क्षेत्रातील माहिती लक्षात घेऊन आणि सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असणाऱ्या मास या संघटनेने पुरस्कार देऊन गौरवलेल्या ज्येष्ठ पत्रकार शशिकांत कणसे यांची या पदासाठी निवड करून त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. 
या नियुक्तीबद्दल केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाचे सदस्य यशवंतभाऊ भोसले, विधान परिषद सदस्य आ. शशिकांत शिंदे, सातारा टुडेचे संपादक संग्राम निकाळजे, प्रतिनिधी विनित जवळकर, सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य संतोषभाऊ जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील, सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. सीता राम हादगे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, ठोसेघरचे उपसरपंच जयराम चव्हाण, ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर आप्पा चव्हाण, पांगारे येथील उद्योजक विष्णू पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले.