maharashtra

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीसह सासूवर गुन्हा


Crime against husband and mother-in-law for inciting suicide
येथील मंगळवार पेठेतील शुभांगी गणेश खांडेकर (वय 26)हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील मंगळवार पेठेतील शुभांगी गणेश खांडेकर (वय 26)हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश विष्णू खांडेकर, सुर्वणा विष्णू खांडेकर (रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी खांडेकर हिने मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिची आई पुण्याहून सातार्‍यात आली. आईने पाहिले असता शुभांगीने गळफास घेतल्याची खात्री झाली. त्यानंतर शुभांगीची आई सविता सुनिल माळेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पती व सासूने तिचा शारिरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यामुळेच तिने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.