जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकील देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी केले.
खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधाऱ्यांना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.
अवघ्या सात विद्यार्थींनीवर येथील करंदीकर वाड्यात सुरू झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष शुक्रवार दि 22 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवाच्या पूर्व दिनी सातार्यात पोवई नाका ते राजवाडा ते कन्या शाळा अशी मशाल फेरी काढण्यात आली. या मशालीचे कन्या शाळा शिक्षक वृंद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
येथील मंगळवार पेठेत एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
येथील झेंडा चौक परिसरातून राहत्या घरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतील चैतन्य वास्तूच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या १६ हजार रुपये किंमतीच्या २० सेट्रींगच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याची घटना दि. १६ रोजी घडली.
साताऱ्यातील गुरुवार पेठेतील कसबा हायटस येथील पार्किंगमधून ७० हजार रुपये किंमतीची इनफिल्ड बुलेट क्रमांक एम. एच. ११ सी. एफ. ९७२३ ही दि. १७ रोजी अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली.
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत खड्डयात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
आनेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.