maharashtra

डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी बचत खाते उघडण्यासाठी विशेष उपक्रम


Special initiative to open Sukanya Samrudhi Savings Account through Postal Department
डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नुकत्याच पार पडलेल्या "आधार -मोबाईल लिंकिंग ड्राईव्हद्वारे सातारा जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सेवा देण्यात सातारा डाक विभाग यशस्वी झाला आहे.

सातारा : डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नुकत्याच पार पडलेल्या "आधार -मोबाईल लिंकिंग ड्राईव्हद्वारे सातारा जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सेवा देण्यात सातारा डाक विभाग यशस्वी झाला आहे.
पोस्ट ऑफिसद्वारे उपलब्ध सर्व नागरिक केंद्रित सेवा आणि कल्याणकारी योजनांसह प्रत्येक नागरिकापर्यंत सर्वत्र पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही सातारा टपाल विभागात दि. ११ऑक्टोंबर  या आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून तसेच नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी या विशेष उपक्रमाची सुरुवार करत आहोत. सातारा डाक विभागाच्या प्रमुख अपराजिता सिधा यांनी सातारा डाक विभागामार्फत मुलींचे "सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. डाक विभागामार्फत, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत, सातारा जिल्हातील सर्व लहान मोठ्या गावापर्यंत पोहचून, १० वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हि योजना मा.पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु झाली असून भारत सरकार मार्फत उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली व सर्वात जास्त व्याजदर असणारी योजना आहे.
काही वैशिष्टे
प्रारंभिक गुंतवणूक रुपये २५०/-. २. ० ते १० वयोगटातील मूली खाते उघडण्यास पात्र. नैसर्गिक किवा कायदेशीर पालक आवश्यक, नंतर ची जमा रुपये १००/- च्या पटीत कितीही वेळा जमा करता येता. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १५००००/- व कमीत कमी १०००/- रुपये जमा करता येतात. १५ वर्षे रक्कम भरा, खाते २१ वर्षाने परिपक्व. मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद करायची सुविधा. आवश्यक कागदपत्रे: पालाकाची के. वाय. सी. आणि मुलीचा जन्म दाखला. सेक्शन ८० सी संतर्गत आयकरात सुट ही योजना राबण्याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गैर सरकारी संस्था, खाजगी संस्था पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व १० वर्षाखालील मुलींचे सुकन्या खाते उघडू शकतात.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची विनंती डाक विभागाच्या प्रमुख प्रवर अधिक्षक अपराजिता सिधा यांनी केली आहे. सुकन्या समृद्धी या योजनेची सविस्तर माहिती देण्याकरीता तसेच शंकांचे समाधान करण्याकरिता सातारा डाक विभागाने विशेष हेल्प लाइन नंबर ची सोय करण्यात आलेली आहे. सुकन्या समृद्धी योजना हेल्प लाइन नं-८२७५७०० ६५४, अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किवा खालील पत्त्यावर संपर्क करावा. सातारा विभागीय कार्यालय, सातारा. Email ID- dosatarn.mh@indiapost.gov.in, Website- www.indiapost.gov.in