maharashtra

बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा


Crime against anonymity for making defamatory text viral
पतीसह पत्नीचा फोटो एकाने फेसबुकवर टाकून ‘हे दोघे पती व पत्नी आहेत. प्रेमाचे लालच दाखवून घरी नेतात आणि मारतात,’ असा मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पतीसह पत्नीचा फोटो एकाने फेसबुकवर टाकून ‘हे दोघे पती व पत्नी आहेत. प्रेमाचे लालच दाखवून घरी नेतात आणि मारतात,’ असा मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदार शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. ही घटना 16 रोजी घडलेली आहे. तक्रारदार यांनी फेसबुक पाहिल्यानंतर बदनामीकारक मजकूर दिसल्याने सायबर अ‍ॅक्ट अन्वये तक्रार दिली आहे.