खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फक्त नायगावमध्येच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहचविले पाहिजे.सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगावचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
"क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन अभिवादन केले.
सातारा तालुक्यातील आरळे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळील वळणावर एका भरधाव टँकरने धडक दिल्याने दोघे जखमी झाले तर अन्य दोघांच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. टँकरचालकाचे नाव समजू शकलेले नाही.
अपंगत्वावरुन सतत टोमणे मारुन तसेच वारंवार त्रास देवून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा अंगापूर वंदन येथील चौघे आणि किरोली येथील एकजण अशा पाचजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यमुना घाडगे, तुकाराम घाडगे, विकास घाडगे, ज्योती घाडगे आणि नामदेव चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा येथील भूविकास बँक चौकात एका टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला.
घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन दोन महिलांनी एका महिलेला पळवून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चैताली अशोक मते आणि योगिता पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
सध्या थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे. या परिस्थितीत अनेक निराधार, गोरगरीब लोक या थंडीतच रस्त्याकडेला कुडकुडत झोपलेले दिसतात. अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने मलकपूरचे युवानेते श्री. संदीप मुट्टल यांनी त्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले. या कृतीतून त्यांनी गरजूंना एकप्रकारे मायेची ऊबच दिली आहे.
गोटे, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्गावरच धावत्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी २ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तालुक्यातील खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना महामार्गावरच अचानकपणे ट्रॅक्टरचा पुढील भाग तुटून पडला. याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.