कराड पालिकेकडून बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता
घाटावरही राबवली मोहीम : मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन
येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता केली. यामध्ये नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच नदीपात्रालगत झाडा-झुडपांमध्ये अडकलेला प्लास्टिकसह अन्य कचराही काढण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.
कराड : येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता केली. यामध्ये नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच नदीपात्रालगत झाडा-झुडपांमध्ये अडकलेला प्लास्टिकसह अन्य कचराही काढण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.
नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 स्पर्धेत याहीवर्षी सहभाग घेतला असून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी ३ रोजी पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलातील कर्मचार्यांच्या सहाय्याने बोटीद्वारे कृष्णा नदीत पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच नदीपात्रालगत झाडा-झुडपांमध्ये अडकलेला कचराही काढण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी सुकलेली झाडे-झुडपेही जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली.
त्याचबरोबर पालिकेच्या विविध विभागाकडून माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याअंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष सवंर्धन आदींना प्रोत्साहन देत विविध स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. त्यालाही पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.


